शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खासदारांवर हल्लाबोल- सत्तेची मस्ती दाखवू नका; अन्यथा जशास तसे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:40 IST

तासगाव : दोन दिवसांपूर्वी तासगावात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली मारहाण आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत

ठळक मुद्देतासगावच्या सभेत अजित पवार, धनंजय मुंंडेंचा हल्ला

तासगाव : दोन दिवसांपूर्वी तासगावात भाजप आणि  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली मारहाण आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,  राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली. सत्तेची मस्ती दाखवू नका, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा यावेळी दिला.

धनंजय मुंडे म्हणाले, आमच्या हल्लाबोल आंदोलनाआधीच तासगावात हल्लाबोल सुरू झाला आहे. इथे पोलीस ऐकत नाहीत, म्हणून खासदारांनी पोलिसांना मारहाण केली. सत्तेत आहात म्हणून सत्तेची मस्ती राष्टÑवादीसमोर दाखवू नका. आम्ही सुसंस्कृत आहोत. आम्हाला काही करता येत नाही, असं खासदारांनी समजू नये. उद्या अजितदादा मुख्यमंत्री झाले, तर त्यांनीही गृहखाते घ्यायला पाहिजे. त्याशिवाय ही माणसं सरळ होणार नाहीत.

ते पुढे म्हणाले, ज्या पध्दतीने सत्ता वापरताय, त्याला मर्यादा ठेवा. खासदारांच्या दादागिरीला घाबरायचे काम नाही. राष्टÑवादी त्याला चोख उत्तर द्यायला सक्षम आहे.अजित पवार म्हणाले, कायद्याचे राज्य राबवणाऱ्या आबांच्या गावात असे निंदनीय प्रकार घडतात, ही शोकांतिका आहे. आमदार, खासदार झाले म्हणून त्याला फार अक्कल आली, असे होत नाही. मिळालेल्या पदाचा वापर सामान्यांसाठी करायला हवा. चांगले काम करून जनतेचा विश्वास संपादन करण्याचे खासदार महोदयांनी काम करावे. इथे जे चालले आहे, ते सहन करणार नाही. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी आहेत. खोड काढण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा यावेळी पवार यांनी दिला.ठेकेदार पोट भरायला भाजपातजयंत पाटील म्हणाले, आम्ही विचारांचा हल्लाबोल करतो; मात्र तासगावात प्रत्यक्ष हल्लाबोल सुरू आहे. याचा पोलिसांनी विचार करायला हवा. पोलिसांनी आम्हाला सुरक्षा द्यायची असते, मात्र आम्हालाच पोलिसांना संरक्षण द्यायला लागते की काय, असे वाटत आहे. चार-दोन कार्यकर्ते ठेकेदार पोट भरायला भाजपात गेले आहेत. आम्हीही फार विचार केला नाही. तिकडे सत्ता आहे, तोपर्यंत राहू द्यात. पण सामान्य कार्यकर्ता मात्र आर. आर. पाटील यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारण